Insurance Service


CSC Services

प्रधानमंत्री श्रम योगी मानधन योजना (Pradhan Mantri Shram Yogi Maandhan Yojna)

👉 हे एक पेन्शन खाते असणार आहे
👉 याच्या मध्ये सहभागी होणाऱ्या प्रत्येक खाते धारकाला वेगळा पेन्शन नंबर दिला जाईल
👉 भारत सरकार व LIC India यांच्या संयुक्त विद्यमाने ही योजना अंमलात आणली आहे
👉 या योजने मध्ये सहभागी होणेकरिता आधार कार्ड व राष्ट्रीयकृत बँकेचे पासबुक आवश्यक
👉 योजनेत सहभागी होणेचे वय १८ ते ४०
👉 ज्यांचे मासिक उप्तन्न १५००० रु पेक्षा कमी आहे व ज्यांचे NPS किंवा EPFO खाते नाही असे सर्व या योजनेचा लाभ घेऊ शकतात
👉 याच्या मध्ये वयोमानानुसार हफ्ता राहील ज्याचे वय कमी त्याला कमी व जास्त वयाला जास्त हफ्ता
👉 कमीत कमी हफ्ता वय वर्ष १८ साठी फक्त रु ५० व जास्तीत जास्त हफ्ता हा वय वर्ष ४० साठी फक्त रु २०० दरमहा
👉 आपण जितका हफ्ता भरणार आहेत आपल्या खात्यात तेवढाच हफ्ता भारत सरकार प्रत्येक महिन्याला आपल्या खात्यावर भरणार आहे
👉 वयाच्या ६० वर्षानंतर मासिक मानधन रु ३००० चालू होईल
👉 कोणत्याही कारणाने जर त्या नागरिकाचा मृत्यू होतोय तर त्यांचा वारस ही योजना पुढे चालू ठेऊ शकतो
👉 काही ठराविक वर्षे गेल्यानंतर आपणास ह्या योजनेमध्ये हफ्ते भरणे शक्य होत नसल्यास तर आपण आपले पेंशन खाते बंद करू शकतो
👉 पेंशन खाते बंद केले नंतर आपणास आपण जेवढी काही रक्कम आपल्या पेंशन खात्यात भरली असेल ती व्याजा सहित परत मिळेल या मध्ये भारत सरकार यांचा हिस्सा मिळणार नाही


तरी आजच प्रधानमंत्री श्रमयोगी मानधन योजनेत आपले पेंशन खाते सुरू करा व आपले भविष्य सुरक्षित करा

जनहितार्थ प्रसारित